Header Ads

निधीअभावी पाच ‘आपला दवाखाने’ बंद; तात्काळ सुरू करा, अन्यथा ढोल बजाव आंदोलन!

 निधीअभावी पाच ‘आपला दवाखाने’ बंद; तात्काळ सुरू करा, अन्यथा ढोल बजाव आंदोलन!

आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच बाळासाहेबांच्या नावाचा दवाखाना बंद; करवीर शिवसेना ठाकरे गटाचा प्रशासनाला इशारा.

कोल्हापूर | प्रतिनिधी

निधीअभावी ठेकेदाराकडून सेवा बंद करण्यात आल्याने कोल्हापूर शहरातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ योजनेतील पाच दवाखाने १ नोव्हेंबरपासून बंद आहेत. लोणार वसाहत, जिवबानाना पार्क, कनाननगर, राजेंद्रनगर झोपडपट्टी आणि ब्रह्मपुरी टेकडी येथील दवाखाने तातडीने सुरू करण्याची मागणी करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.

या दवाखान्यांमधून दररोज शेकडो गरीब, कष्टकरी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना दुपारी २ ते रात्री १० या वेळेत मोफत आरोग्यसेवा मिळत होती. मात्र, दवाखाने बंद झाल्याने सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होत आहे.

याबाबत आरोग्य विभागाला निवेदन देत करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी, दवाखाने तातडीने सुरू न केल्यास ढोल बजाव आंदोलन आणि आरोग्यमंत्र्यांची गाडी अडविण्याचे आंदोलन छेडू, असा इशारा दिला.

No comments:

Powered by Blogger.