बुरंबाळी येथे त्रिपुरारी पौर्णिमा व तुळशी विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न.
बुरंबाळी येथे त्रिपुरारी पौर्णिमा व तुळशी विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न.
कळे प्रतिनिधी :
साईश मोळे
९५९५३१६२६६
श्री स्वामी गगनगिरी महाराज आश्रम, बुरंबाळी येथे त्रिपुरारी पौर्णिमा व तुळशी विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात संपन्न झाला.
गगनगिरी महाराज सेवा ट्रस्ट, बुरंबाळी ता. राधानगरी यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यासाठी सदानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटेपासूनच धार्मिक विधींना सुरुवात झाली. यावेळी श्री स्वामी गगनगिरी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक, महापूजा, आरती करण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना सात्तापा चौगले यांनी केली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत प. पू. स्वामी गगनगिरी महाराज सेवा ट्रस्ट, बुरंबाळीचे भक्तमंडळींनी केले.
सायंकाळी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव करण्यात आला. आश्रम परिसर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला होता. त्यानंतर विधिवत तुळशी विवाह सोहळा पार पडला. यावेळी महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून तुळशी विवाहाची गाणी म्हटली. उपस्थित भाविकांनी 'गगनगिरी महाराज की जय' चा जयघोष केला.
या सोहळ्यासाठी बुरंबाळी, राधानगरीसह कोल्हापूर जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे आभार विजय परब यांनी मांडले, तर समारोप सागर पाटील यांनी केला.

No comments: