मंडलिक कारखान्यावर वाहनांना रिप्लेक्टर लावण्याचा शुभारंभ.
मंडलिक कारखान्यावर वाहनांना रिप्लेक्टर लावण्याचा शुभारंभ.
मुरगूड/ जोतीराम कुंभार
सदाशिवनगर - लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालूका सहकारी साखर कारखान्याकडे ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांना जे. के. इंडिया शुगर व चिनीमंडी ग्रुपच्या वतीने कारखान्याचे संचालक व गोकुळ दुध संघाचे संचालक अँड. विरेंद्र मंडलिक यांचे हस्ते कारखान्याकडे ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांना रिप्लेक्टर लावण्याचा शुभारंभ करणेत आला.
यावेळी बोलताना अँड.विरेंद्र मंडलिक म्हणाले सद्या आपला साखर कारखाना पुर्ण क्षमतेने सुरू असुन आपल्या कारखान्याकडे ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांमुळे व बाहनाना अपघात होवू नयेत म्हणुन रिप्लेक्टर असणे गरजेचे आहे. सद्या अपघाताचे प्रमाण वाढलेले असुन त्यामुळे सर्व वाहतुकदारांनी आपल्या वाहनांना रिप्लेक्टर लावले शिवाय ऊस वाहतुक करू नये. असे आवाहन ही त्यांनी केले. तसेच जे. के. इंडिया व चिनीमंडी ग्रुपच्या वतीने सदर रिप्लेक्टर दिले असुन चिनीमंडी ही साखर दर, इथेनॉल, बायो एनर्जी संदर्भात माहिती देणारी भारतातील एक कंपनी आहे. त्यांनी सामाजिक बांधिलकीतून आपल्या साखर कारखान्यातील वाहनांना रिप्लेक्टर दिले बद्दल त्यांनी कारखान्यामार्फत चिनी मंडीचे कंपनीचे पारस पाटील व अक्षय पाटील यांचे आभार मानले
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील, के बी बुरटे सरपंच हमिदवाडा, कामगार प्रतिनीधी सर्जेराव पाटील, केनयार्ड सुपरवायझर गजेंद्र सातपुते, संगणक इनचार्ज अजित पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments: