Header Ads

आयशर टेम्पोची दुचाकीला धडक एक जण जागीच ठार

 आयशर टेम्पोची दुचाकीला धडक एक जण जागीच ठार


मुरगूड/ प्रतिनीधी जोतिराम कुंभार 

  निपाणी मुरगूड मार्गावरील हमिदवाडा साखर कारखान्याच्या पेट्रोलपंपा समोरआयशर टेम्पोने दुचाकी स्वराला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला.अशोक यशवंत माळी( वय ४५ रा.  सदाशिवनगर/ हमिदवाडा- बसतवडे)असे मृताचे नाव आहे. या  अपघातापूर्वी आयशर टेम्पोने एका कारलाही पाठीमागून धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे.

      मुरगुड पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हमिदवाडा कारखानकारखान्यांच्या पेट्रोल पंपा समोर कार थांबली होती.यावेळी कारचालक व एका प्रवाशाची काही कारणावरून बाचाबाची सुरू होती.त्यामुळे परिसरात काही नागरिकांचा घोळखा जमला होता.दरम्यान कागलच्या दिशेने  जाणाऱ्या आयशर टेम्पो चालकाने जमलेल्या नागरिकांना चुकवण्याच्या प्रयत्नात थांबलेल्या कारला पाठीमागून धडक दिलीत्यानंतर समोरून येणाऱ्या अशोक माळी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत माळी हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.रात्री उशिरापर्यंत  अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.आयशर टेम्पोच्या धडकेने झालेल्या या अपघाताबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.मृत अशोक माळी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.मृत माळी यांचा सदाशिवनगर हमिदवाडा येथे हॉटेलचा व्यवसाय आहे.

No comments:

Powered by Blogger.