Header Ads

साताऱ्यात अवैध दारू वाहतुकीचा पर्दाफाश! ३४.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त

 साताऱ्यात अवैध दारू वाहतुकीचा पर्दाफाश! ३४.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त


आयशर ट्रकमधून टँगो पंच देशी दारूची तस्करी; चालक ताब्यात, दोघांची नावे निष्पन्न

सातारा | प्रतिनिधी. अमर इंदलकर 

सातारा शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने अवैध देशी दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करत तब्बल ३४ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कराडकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या आयशर ट्रकमधून टँगो पंच देशी दारूची विनापरवाना वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पिरवाडी येथील किया शोरूमसमोर आणि वाढे फाटा येथे पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना पाहताच ट्रकसोबत असलेली क्रेटा कार पसार झाली; मात्र पाठलाग करून आयशर ट्रक मर्ढे गावाजवळ पकडण्यात आला. ट्रकची तपासणी केली असता पाण्याच्या बॉक्सऐवजी देशी दारूचे बॉक्स आढळले.

या कारवाईत १५ लाख ३६ हजारांची दारू, १८ लाखांचा आयशर ट्रक आणि ८१ हजार २०० रुपयांचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले. महेंद्र आनंदा डुबल याला ताब्यात घेण्यात आले असून जमीर हारुन पटेल आणि मंगेश एकनाथ हरपळे यांची नावेही निष्पन्न झाली आहेत.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे व डी.बी. पथकाने ही कारवाई केली.

अवैध दारू वाहतुकीवर सातारा पोलिसांचा दणका; ३४ लाखांचा माल जप्त झाल्याने तस्करांचे धाबे दणाणले!

No comments:

Powered by Blogger.