Header Ads

रक्तदानाबरोबरच अवयवदानाची चळवळ गतिमान होणे गरजेचे!उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांचे प्रतिपादन;

 रक्तदानाबरोबरच अवयवदानाची चळवळ गतिमान होणे गरजेचे!उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांचे प्रतिपादन; पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघाच्या रक्तदान शिबिरात ३४३ रक्तदात्यांचे योगदान

माधुरी मस्कर-पन्हाळा 

 रक्तदान हे जीवनदान आहे. मात्र, रक्तदानाबरोबरच अवयवदानाची चळवळही समाजात गतिमान होणे गरजेचे आहे. अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे समाजात अवयवदानाबाबत जनजागृती निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कोल्हापूरच्या उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले.

पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, जवान व निष्पाप नागरिकांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष सरदार एन. काळे होते.

शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल ३४३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. शहीदांनी देशासाठी सांडलेल्या रक्ताचे स्मरण ठेवत रक्तदानाच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्याचा पत्रकार संघाचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. शिबिरातील रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

यावेळी कळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक कदम, गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, मंडल अधिकारी सुहास घोदे, कला शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मारुती परितकर, पन्हाळा पंचायत समितीचे सभापती रवींद्र पाटील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सुरेश पवार, प्रशांत पोवार, आसगावचे सरपंच श्रीकांत पाटील, लाल बावटा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव घोरपडे, घरपणचे सरपंच नामदेव मोळे, दैनिक सकाळचे उपसंपादक रंगराव हिर्डेकर, डॉ. अमित  पाटील ( नवसंजीवन हॉस्पिटल ) , सरदार पाटील (सावर्डे), समर्थ बहुउद्देशीय संस्थेचे सचिव संभाजी दांगट, शरद दंताळ, सुरेश नाईक , रंगराव शिखरे आदी उपस्थित होते.

पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सचिन सुतार, सचिव धनाजी गुरव, कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, पी. व्ही. पाटील, बाबासो चौगले, शिवाजी पाटील, अरुण तळेकर, दत्तात्रय पाटील, सागर मोरे, अरुण चौगले, सर्जेराव जाधव, विलास पाटील, धनाजी पाटील, रघुनाथ मोरे आदींनी शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

३४३ रक्तदात्यांचे योगदान आणि शहीदांच्या स्मृतींना सामाजिक कार्यातून दिलेली मानवंदना, यामुळे या उपक्रमाने पश्चिम पन्हाळा परिसरात सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.

No comments:

Powered by Blogger.