मुरगूड शहरातील शिवगड मध्ये समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचे स्वागत.
मुरगूड शहरातील शिवगड मध्ये समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचे स्वागत.
-----------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
-----------------------------
मुरगूड शहरातील शिवगड या अध्यात्मिक केंद्रामध्ये समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचे भक्तीपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.
येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांची सज्जनगडावर अनेक प्रवचने झाली आहेत. सज्जनगडावरील शिबिरामध्ये भाग घेण्यासाठी मुरगूड येथील अनेक भाविक जात असत. याशिवाय रायगड जिल्ह्यातील शिवथर घळी येथे सुद्धा डॉ .देशमुख तथा काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी समर्थ भक्तांसाठी शिबिरे आयोजित केली जात असत.
सज्जनगडावरून आलेल्या स्वामींच्या पादुकांचे स्वागत ,दर्शन व पूजन असा कार्यक्रम शिवगड आध्यात्मिक केंद्रात संपन्न झाला.
डॉ. देशमुख तथा काकाजी हे वार्धक्या मुळे घरीच विश्रांती घेत आहेत.ते स्वामींचे निस्सिम भक्त आहेत. स्वामींच्या पादुका दर्शनासाठी सव्यसाची या त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आल्या.
अत्यंत भावभक्तीने त्यांनी हात जोडून बिछान्यावरूनच गुरू पादुकांचे दर्शन घेतले.
Comments
Post a Comment