' सोन्या ' बैलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांनी केले उत्तरकार्यासह अन्नदान.

 ' सोन्या ' बैलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांनी केले उत्तरकार्यासह अन्नदान.

-----------------------------------

मुरगूड प्रतिनिधी

 जोतीराम कुंभार

-----------------------------------

         मुरगूड येथील देशमुख कॉलनीत राहणाऱ्या मारूती शंकर चौगले या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा अविभाज्य घटक बनलेल्या व त्याच्यावर जिवापाड प्रेम करीत असलेल्या ' सोन्या ' नावाच्या बैलाचा मृत्यू झाला . सारे कुटुंब शोकाकुल झाले . त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी फोटो पूजन व उत्तरकार्य विधीसह अन्नदान करीत शेवट गोड करण्याचा प्रयत्न चौगले कुटुंबीय करीत आहेत . चौगले कुटुंबाचे प्राण्याप्रती असलेल्या प्रेमाबद्दल परिसरातून कौतुक होत आहे .

            येथील देशमुख कॉलनीत राहणाऱ्या मारूती शंकर चौगले या शेतकऱ्यांनी १४ वर्षापूर्वी मुरगूडच्या जनावरांच्या बाजारातून बैल खरेदी करून घरी आणला होता . शेती कामासाठी आणलेल्या बैलाचा अल्पावधीतच पत्नी सविता , मुलगी सुप्रिया , मुलगे विघ्नेश व ओंकार यांना लळा लागला . तसे त्याचे सोन्या असे नामकरणही झाले . तसा सोन्या परिसरातील सर्वांचाच लाडका झाला होता . असा हा सोन्या वयोमानानुसार स्वर्गवाशी झाला . अन त्याच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या चौगले कुटुंबात शोककळा पसरली . लाडक्या सोन्याला निरोप देण्यासाठी त्याचा घराशेजारील मोकळ्या जागेत दफनविधी करण्यात आला . सोन्या बैलानेही चौगले कुटुंबांच्या शेतीची सेवा करीत त्यांच्या भरभराटीत खारीचा वाटा उचलला आहे . अशा या सोन्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी तसेच इतरांनीही प्राण्याप्रती प्रेम जोपासावे म्हणून सोन्या बैलाचे फोटो पूजनासह उत्तर कार्य विधी करीत अन्नदान करण्यात येणार असल्याचे मारुती चौगले यांनी सांगितले .

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.

हिम्मत असेल तर राजेश पवाराणी भिलारेना बोट लावून दाखवावे _ माधव पाटील पवळे.