बिद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात डायलिसिस विभाग सुरू करा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन
बिद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात डायलिसिस विभाग सुरू करा
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन.
-----------------------------
भुदरगड स्वरूपा खतकर
-----------------------------
सर्वसामान्य कुटुंबातील किडणी विकाराच्या रुग्णांचा विचार करून शासनाने बिद्री आरोग्य केंद्र व मुरगूड ग्रामीण रुग्णालयात मोफत डायलिंसिस विभाग सुरू करावा, अशी मागणी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचेकडे (कागल )सोनाळीचे ग्रामपंचायत सदस्य समाधान म्हातुगडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कागल तालुक्यातील बिद्री व मुरगूड परिसर झपाट्याने वाढत आहे. अनेक वर्ष ग्रामीण रुग्णालये चांगली सेवा देत आहे. वाढणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता बिद्री व मुरगूड येथे शासनाने रुग्णालय परिसरात एक नव्याने इमारत उभी केली आहे. अलीकडच्या काळात डायलिसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या रुग्णांना उपचारासाठी कोल्हापूर या ठिकाणी जावे लागत आहे. अनेक कुटुंबांना डायलिसिसचा खर्च न परवडणारा आहे. त्यामुळे शासनाने बिद्री आरोग्य केंद्र व मुरगूड ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस विभाग सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, अलकेश कांदळकर, सागर तापेकर, बसवराज कोरे, एम. एम. चौगले, मधुकर म्हातुगडे, भिकाजी बचाटे, भिमराव कांबळे आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

No comments: