गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.
गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.
--------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
---------------------------------
गांधीनगर :- गांधीनगर येथील सोनी होजिअरी अँड किड्स वेअर या दुकानातील एका कर्मचाऱ्याने मालकाची तब्बल ७ लाख ५१ हजार २८० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दुकानाच्या मालकांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, आरोपी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गांधीनगर येथील रहिवासी अमित लेखराज जेवराणी (वय ४०) यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात ही फिर्याद दिली आहे. त्यांच्या आईच्या मालकीच्या 'सोनी गारमेंट' नावाच्या दुकानात दीपक जियंदराय पोपटाणी याला २०१८ पासून कामावर ठेवण्यात आले होते.
फिर्यादीनुसार, दीपक पोपटाणीने दुकानात काम करत असताना, 'सोनी होजिअरी अँड किड्स वेअर' या नावाचा वापर करून विविध व्यापाऱ्यांकडून माल खरेदी केला. त्याने ७ लाख ५१ हजार २८० रुपयांच्या मालाचे पैसे परस्पर घेतले. एवढेच नव्हे, तर काही व्यापाऱ्यांच्या नावाने खोटी बिले (बिल्स) तयार करून माल आणि पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. यातून त्याने मालक अमित जेवराणी यांची मोठी आर्थिक फसवणूक केली.जेवराणी यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ गांधीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी फिर्यादीच्या माहितीवरून आरोपी दीपक पोपटाणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सध्या या प्रकरणाची चौकशी चालू आहे. मात्र या फसवणुकीमुळे गांधीनगरमधील व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
Comments
Post a Comment