Header Ads

जी बी एस आजाराने ग्रासलेल्या स्वरूपची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी !खोतवाडीसह परिसरात शोककळा : कुटुंबावर दुःखाचा डोंगर.

जी बी एस आजाराने ग्रासलेल्या स्वरूपची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी !खोतवाडीसह परिसरात शोककळा : कुटुंबावर दुःखाचा डोंगर.

--------------------------------------

आशिष पाटील पन्हाळा 

--------------------------------

पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी येथील स्वरूप तानाजी खोत (वय २२) या तरुणाला GBS (गिलियन बरे सिंड्रोम) नावाचा गंभीर व दुर्मीळ आजार झाला होता.कावीळ आणि इतर शारीरिक तक्रारीमुळे त्याला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.घरची अर्थिक परस्थिती बेताची असल्याने सीपीआर रूग्णालयात त्याच्यावर सव्वा महिन्यापासून उपचार सुरू होते.

   मनमिळाऊ आणि एकूलता असलेल्या स्वरूपचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या मित्रांनी आणि गावकर्‍यांनी पुढाकार घेऊन चाळीसहून अधिक रक्ताच्या बॅग संकलित करुन रूग्णालयाला पुरविल्या तर एक लाखाच्या जवळपास अर्थिक मदत देखील जमा केली.परंतू नियतिच्यापुढे सर्व हातबल झाल्याने सोमवारी रात्री स्वरूपची रूग्णालयात प्राणज्योत मालवली.मोलमजूरी करून हाताच्या फोडासारखा जपलेल्या एकुलत्या मुलग्याचा ऐन दिवाळीत झालेला मृत्यू पाहून आई ,वडील आणि नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा पाहून उपस्थित गहिवरले. तर स्वरूपचा जीव वाचावा म्हणून महिनाभर धडपडत असलेल्या त्याच्या मित्रांनी मित्रा तुला वाचविण्यासाठी अपयशी ठरलो..रे म्हणत  केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचे मन सुन्न होऊन डोळे पाणावले. स्वरूपच्या निधनाने खोतवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होऊन शोककळा पसरलीय.

No comments:

Powered by Blogger.