खुपिरेतील तरुण उद्योजकावर काळाचा घाला
खुपिरेतील तरुण उद्योजकावर काळाचा घाला.
विशाल संजय आडनाईक-------------------------------------
काटेभोगाव प्रतिनिधी-बबन खाटांगळेकर
-------------------------------------
खुपिरे ता.करवीर:- दिवाळीतील लक्ष्मीपूजन दिवशी विशाल संजय आडनाईक यांच्या आनंद ज्वेलर्स चे उद्घाटन आमदार नरके साहेब यांच्या हस्ते झाले. विशालची पूर्ण मित्रमंडळी पाहुणे-रावळे सर्व उद्घाटनला हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. विशाल आलेल्या सगळ्यांना नमस्कार करून आनंदाचा पेढा देऊन स्वागत करत होता. उद्घाटनच्या कार्यक्रमाचे नियोजन त्यांचे वडील संजय आडनाईक करीत होते. विशाल सुद्धा मित्रमंडळींना आपुलकीने सर्वांशी बिझनेस संदर्भात रंगून गेला होता. हा आनंद फार काळ टिकला नाही. उद्घाटनाच्या रात्री सर्व पाहुणे-रावळ्यांना मित्रमंडळींना निरोप देउन रात्री बारा ते एक च्या दरम्यान घरातील सर्व झोपी गेले् नियतीच्या मनात काही वेगळाच डाव होता .विशाल कदाचित रात्री स्वप्नात रंगून गेला असेल , उद्या मी माझ्या स्वतःच्या बिजनेस मध्ये सोनार म्हणून खुर्चीवर बसेल अशी अनेक स्वप्ने पाहत झोपला असेल, परंतु नियतीने डाव साधला सकाळी विशाल सहा वाजता उठून अंघोळ करतेवेळी त्याला नाकातून रक्त आले असे जाणवलले 'पप्पा' हा एकच शब्द उच्चारल्यानंतर विशाल खाली कोसळला घरातील सर्व मंडळी एकत्र येऊन बाथरूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर विशाल बेशुद्ध अवस्थेत दिसला. घरातील सर्वांनी हंबरडा फोडला. कोल्हापुरातील सीपीआर दवाखान्यात घेऊन गेले. परंतु त्याचा शेवटचा श्वास कधीच बंद झाला होता. ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पोहोचली रात्री हजारो पाहुणेरावळे मित्रमंडळी आलेल्यांना समजतात त्यांना विश्वासच बसेनासा झाला .अवघ्या 22 व्या वर्षी विशाल जातो हे कुणाला पटनासे झाले. ही धक्कादायक बातमी समजताच खुपिरे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. काल विशालने दिवाळीच्या सणावर बिजनेस चालू केला आणि अवघ्या आठ तासात या जगातून निघून गेलाल्याने . संपूर्ण खुपीरे गांव दुःख सागरात बुडाले आहे.

No comments: