जुळेवाडी खिंड येथे अज्ञात परिस्थितीत तरुणाचा मृतदेह आढळला
जुळेवाडी खिंड येथे अज्ञात परिस्थितीत तरुणाचा मृतदेह आढळला.
-------------------------------------शाहूवाडी तालुक्यातील बहिरेवाडी हद्दीतील जुळेवाडी खिंड येथे आज (दि. 21 ऑक्टोबर 2025) सकाळी दहा वाजताच्या सुमारास सुनील आनंदा मोरे (वय 37, रा. येळाणे, ता. शाहूवाडी) या तरुणाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेहाजवळ मोठ्या प्रमाणावर माश्या आढळल्या असून, त्याच्या अंगात फिकट हिरवट रंगाचा फुल शर्ट व काळ्या रंगाची फुल पॅन्ट होती. मृतदेह अत्यंत सडलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती.
मृत सुनील मोरे हा गवंडी काम तसेच हातकाम करून रोजंदारीवर उपजीविका करत होता. तो 16 ऑक्टोबर रोजी जेवणाचा डबा घेऊन घरातून कामासाठी बाहेर गेला होता, मात्र त्यानंतर तो परत घरी आला नव्हता.
या घटनेची माहिती पोलीस पाटील रामेश्वर दिलीप शेळके (बजागेवाडी) यांनी पोलिसांना दिली. तत्काळ शाहूवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी अधिक तपास शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय परशुराम शिरसाट व पोलिस हवलदार मानसिंग खताळ करत आहेत.
मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते
No comments: