सांगली-मिरज रस्त्यावर भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू, एक जखमी
सांगली-मिरज रस्त्यावर भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू, एक जखमी.
राजु कदम
मिरज (प्रतिनिधी) – महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज (दि.19 ऑक्टोबर) पहाटे मिरज-सांगली रोडवर झालेल्या भीषण अपघातात विश्वजीत दिलीप नाईक (वय 21, रा. डी मार्ट पाठीमागे, सांगली) या तरुणाचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, मध्यरात्री सुमारे 2.25 वाजता आरोपी चालकाने फोर व्हीलर अतिवेगात चालविताना रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. कुत्रा वाचविण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण सुटून गाडी रोडकडेला असलेल्या जाहिरातीच्या लोखंडी बोर्डावर आदळली. या धडकेत चालकाचा जागीच मृत्यू झाला असून सोबत असलेली व्यक्ती जखमी झाली.
या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गु.र.नं. 266/2024, भा.दं.सं. कलम 281, 125(a)(b), 106(1) व एम.व्ही. ऍक्ट 184 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा अधिक तपास सपोनि संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल एस.एम. गायकवाड करीत आहेत.
No comments: