जयसिंगपूरात तरुणाचा खून : धारदार शस्त्राने वार करून हत्या
जयसिंगपूरात तरुणाचा खून : धारदार शस्त्राने वार करून हत्या.
------------------------------------नामदेव भोसले जयसिंगपूर
-------------------------------
जयसिंगपूर, ता. २३ : येथील गल्ली क्रमांक १३ मध्ये आज (बुधवार) पहाटे सव्वादोनच्या सुमारास ३० वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मृत तरुणाची ओळख सुनील किसन पाथरवट (वय ३०, रा. जयसिंगपूर) अशी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला असून प्राथमिक तपास सुरू आहे.
खूनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुढील तपास जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
No comments: