यड्रावकरांची सत्ता डळमळतेय का? जयसिंगपूरकर नाराज — अपूर्ण प्रकल्पांमुळे नागरिकांत असंतोष.
यड्रावकरांची सत्ता डळमळतेय का? जयसिंगपूरकर नाराज — अपूर्ण प्रकल्पांमुळे नागरिकांत असंतोष.
------------------------------------------
जयसिंगपूर / प्रतिनिधी : नामदेव भोसले
------------------------------------------
जयसिंगपूर आणि शिरोळ तालुक्यातील “यड्रावकर” घराण्याची पकड राजकारणात गेल्या काही वर्षांपासून मजबूत असली, तरी आता नागरिकांच्या मनात नाराजीची ठिणगी पेटताना दिसत आहे. आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आणि जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या कार्यकाळात सुरू झालेले अनेक महत्त्वाचे प्रकल्प आजही अपूर्ण अवस्थेत आहेत.
भुयारी गटार योजना, आश्वारुडी शिवस्मारक, श्रीमंत जयसिंग महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचे पुतळे, दसरा चौकातील क्रिकेट स्टेडियम, तसेच शामराव अण्णा पाटील नाट्यगृह आणि आंबेडकर सोसायटीमधील बुद्ध विहाराची जागा — हे सर्व प्रकल्प केवळ नावापुरतेच राहिल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे की, “कामे सुरू करून अर्धवट ठेवण्याची आणि नंतर दुसऱ्या ठिकाणी ‘भरकटणारी’ विकासाची पद्धत यड्रावकर पाटलांच्या राजकारणाची ओळख बनली आहे.”
--------------------------------
कोरोना काळातील कामगिरीवरही प्रश्नचिन्ह.
------------------------------
आरोग्य मंत्री असताना राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कोरोना काळात नेमकी कोणती ठोस पावले उचलली, याबाबतही नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत. “केवळ अडीच हजार रुपये वाटून मते मिळवली, पण विश्वास जिंकला नाही,” असा सूर शहरातील नागरिकांमध्ये ऐकायला मिळतो.
---------------------------------------
बोगस कंत्राटदारांच्या माध्यमातून निवडणूक खर्च
---------------------------------------
अनेक नागरिकांचा आरोप आहे की, निवडणुकीतील खर्च आणि राजकीय निधी हे बोगस कंत्राटदार व कामगारांच्या माध्यमातून उचलले गेले. “जनतेच्या पैशांतून सत्तेचा डामडा ठोकणाऱ्यांना यंदा जनता धडा शिकवेल,” अशी चर्चा जयसिंगपूरच्या गल्लीबोळात रंगली आहे.
राजकीय वर्तुळात आता मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे — “यड्रावकर पाटलांची सत्ता जयसिंगपूरमध्ये किती काळ टिकेल?”
क्रमशः....

No comments: