Header Ads

राधानगरी पंचायत समितीवर सभापती-उपसभापती पदासाठी राजकीय हालचालींना वेग; पाटील-चौगुले यांच्या नावांची जोरदार चर्चा!

 राधानगरी पंचायत समितीवर सभापती-उपसभापती पदासाठी राजकीय हालचालींना वेग; पाटील-चौगुले यांच्या नावांची जोरदार चर्चा! 

--------------------------

राधानगरी प्रतिनिधी – विजय बकरे.

--------------------------

राधानगरी पंचायत समितीच्या सभापतीपदी राजेंद्र यशवंत पाटील तर उपसभापतीपदी सौ. अश्विनी चंद्रकांत चौगुले यांच्या नावांची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली असून, अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पंचायत समितीवर एकूण दहा सदस्यांपैकी आय काँग्रेसचे सहा उमेदवार विजयी होत सत्ता काबीज केली आहे. विजयी उमेदवारांमध्ये राजेंद्र पाटील, अश्विनी चौगुले, मोहन पाटील, अमृता पाटील, वंदना जाधव व सूर्यकांत पाटील यांचा समावेश आहे. तर अजित पवार गटाचे पुनम पाटील, संग्राम कलीकते आणि एकनाथ शिंदे गटाचे केरबा पाटील, मंगल कांबळे असे चार उमेदवार निवडून आले आहेत.

सत्तेचे गणित आय काँग्रेसच्या बाजूने झुकल्यामुळे सभापती पदासाठी राजेंद्र पाटील आणि उपसभापती पदासाठी अश्विनी चौगुले यांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अंतिम क्षणी राजकीय समीकरणे बदलणार का? अन्य कोणाला संधी मिळणार का? याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

👉 सभापती-उपसभापती निवडीचा अधिकृत निर्णय जाहीर झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होणार असून, राधानगरीच्या राजकारणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.