४८ तासांत तपास पूर्ण; अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात ६ दिवसांत दोषारोपपत्र.
४८ तासांत तपास पूर्ण; अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात ६ दिवसांत दोषारोपपत्र.
--------------------------------------
मिरज प्रतिनिधी
राजू कदम
---------------------------------------
महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्याचा जलद व अचूक तपास करत अवघ्या ४८ तासांत तपास पूर्ण केला असून केवळ ६ दिवसांत मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
दि. ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी पाच वर्षांची अल्पवयीन मुलगी किराणा दुकानात खाऊ आणण्यासाठी जात असताना आरोपी विजय (रा. रेल्वे पंढरपूर चाल, मिरज) याने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली व सखोल तपास सुरू केला.
मा. संदीप पुगे (पोलीस अधीक्षक, सांगली) व मा. कल्पना बारवकर (अपर पोलीस अधीक्षक, सांगली) यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक संदीप सिटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर, हेडकॉन्स्टेबल अभिजीत पाटील, शंकर गायकवाड व इतर पथकाने आवश्यक पुरावे गोळा करून तपास पूर्ण केला.
सदर प्रकरणात संबंधित कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून समाजात कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी जलदगतीने कार्यवाही करत दोषारोपपत्र मा. न्यायालयात सादर केले आहे. या कारवाईबद्दल परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

No comments: