Header Ads

बस स्थानकातील गर्दीचा फायदा घेत मंगळसूत्र चोरी; महिला आरोपी अटकेत, ३.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त. -----------------------------

 बस स्थानकातील गर्दीचा फायदा घेत मंगळसूत्र चोरी; महिला आरोपी अटकेत, ३.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त.

-----------------------------

मिरज प्रतिनिधी

राजु कदम 

-----------------------------

आटपाडी पोलीस ठाणे हद्दीत बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलेचे मंगळसूत्र चोरी करणाऱ्या महिला आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी अटक करून ३ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुरनं. ३८/२०२६, BNS कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजण्याच्या दरम्यान खरसुंडी बस स्थानकावर बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने फिर्यादी अरुणा राजाराम सूर्यवंशी (वय ६७, रा. गोंदीगावठाण, ता. कराड, जि. सातारा) यांच्या गळ्यातील अंदाजे ३० ग्रॅम ८० मिली वजनाचे मंगळसूत्र चोरी केले होते. याबाबत ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे व मा. अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी सहा. पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकास तपासासाठी सूचना दिल्या. गोपनीय माहितीच्या आधारे ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी शारदा बंटी हतवळणी (वय ४०, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली.

आरोपीकडून पंचासमक्ष ३,१२,०००/- रुपये किमतीचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले असून आरोपी व मुद्देमाल पुढील तपासासाठी आटपाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास आटपाडी पोलीस करीत आहेत.

No comments:

Powered by Blogger.