गड मुडशिंगी येथे बौद्ध समाजाच्या वतीने माता रमाई जयंती उत्साहात साजरी.
गड मुडशिंगी येथे बौद्ध समाजाच्या वतीने माता रमाई जयंती उत्साहात साजरी.
------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
------------------------------
७,फेब्रुवारी माता रमाई जयंती रमाईंनी अत्यंत गरिबी आणि संघर्षात संसार सांभाळत बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणासाठी आणि सामाजिक कार्यासाठी मोलाचा त्याग केला
असे मत प्रशांत गोंधळी यांनी व्यक्त केले.
रमाईच्या त्यागाशिवाय आणि कष्टाशिवाय बाबासाहेबांचे शिक्षण पूर्ण झाले नसते रमाई जयंती ही त्यागाची जयंती आपण साजरी करतो. त्या त्यागाचा गुण सर्वांनी स्वीकारले पाहिजे. असे मत रिपब्लिकन सेना करवीर तालुका अध्यक्ष भिमराव गोंधळी यांनी व्यक्त केले.बाबासाहेब जेव्हा परदेशात शिक्षण घेत होते तेव्हा रमाईंनी पोरकेपणा.गरिबी आणि मुलांच्या निधनाचे दुःख सहन केले. आपल्यावरच्या संकटाची जाणीव बाबासाहेबांना होऊ न देता त्यांनी त्यांना शिक्षणासाठी पाठिंबा दिला असे मत अर्जुन कांबळे करवीर सचिव यांनी व्यक्त केले, त्या केवळ बाबासाहेबांच्या पत्नी नव्हत्या. तर त्यांच्या संघर्षमय जीवनातील आधारस्तंभ होत्या असे मत अर्जुन गोंधळी करवीर महासचिव यांनी व्यक्त केले आणि कार्यक्रमाचे आभार मानले
त्यावेळी उपस्थित वैशाख कांबळे सामाजिक कार्यकर्ते, संतोष कांबळे करवीर सचिव अमोल कांबळे, दशरथ गवळी, शिवाजी कांबळे जिल्हा संघटक, दीपक डोणे, संदिप गोंधळी कोषाध्यक्ष, काशिनाथ सोनुले, अविनाश कांबळे, डॉ.संतोष कांबळे, सर्जेराव सावंत, प्रवीण कांबळे, मनोहर कांबळे तात्या, संतोष सोनुले, रमेश बळे, संपत कांबळे, समाजातील नागरिक उपस्थित होते

No comments: