विहिरीत बुडालेल्या महिलेचा मृत्यू ; कुपवाड परिसरात खळबळ.
विहिरीत बुडालेल्या महिलेचा मृत्यू ; कुपवाड परिसरात खळबळ.
------------------------------
कुपवाड प्रतिनिधी
राजू कदम
------------------------------
मिरज / : कुपवाड येथील रुमाले मळा परिसरात विहिरीच्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळलेल्या ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शोभा श्रीकांत शेंबडे (वय ५०, रा. वाघमोडे नगर, कुपवाड ता. मिरज जि. सांगली) या ९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास रुमाले मळा येथील विहिरीच्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांना कृष्णा खांडेकर यांनी तातडीने सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सायं. ४.०० वाजता उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या घटनेची नोंद एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात अ.म.र. क्र. ११/२०२६ BNSS १९४ प्रमाणे करण्यात आली असून शवविच्छेदनाची तजवीज करण्यात आली आहे. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.

No comments: