Header Ads

कुपवाडात नातेवाईकांतील जुन्या वादातून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.

 कुपवाडात नातेवाईकांतील जुन्या वादातून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.

-------------------------------

 मिरज तालुका प्रतिनिधी

 राजू कदम

-------------------------------

कुपवाड (ता. मिरज) – कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या भांडणातून चार जणांनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी (दि. १ मार्च २०२६) सायंकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे येथे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर अशोक इरकर (वय २८, व्यवसाय – गॅरेज, रा. रामावळ कॉलनी, प्लॉट क्र. ३१, कुपवाड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुभाष धुळाप्पा मानकर (२५), संतोष तानाजी मानकर (३१), सचिन धुळाप्पा मानकर (३०) व धुळाप्पा सूर्याप्पा मानकर (५०, सर्व रा. बामनोली, ता. मिरज) यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ५७/२०२६ नोंद करण्यात आला आहे. त्यांच्यावर बीएनएस कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

ही घटना दि. १ मार्च रोजी सायं. ७ वाजण्याच्या सुमारास कवलापूर रोडवरील महादेव मंदिराजवळ, बामनोली-कुपवाड येथील मोकळ्या जागेत घडली. फिर्यादी व आरोपी हे परस्पर नातेवाईक असून, फिर्यादी यांची मावस बहीण वर्षाराणी खांडेकर हिचा विवाह आरोपी क्रमांक ४ यांचा मुलगा आकाश मानकर याच्याशी झाला आहे. वैवाहिक आयुष्यातील कथित छळामुळे ती सध्या सासरी राहत नसल्याने दोन्ही कुटुंबांत जुना वाद सुरू आहे.

सदर वादाबाबत डिसेंबर २०२५ मध्ये दोन्ही कुटुंबांच्या संमतीने सांगली येथील कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्यात आला असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या पार्श्वभूमीवर आरोपी क्रमांक १ यांनी फिर्यादीस बोलावून घेतल्याचा आरोप असून, त्यानंतर आरोपींनी लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांनी मारहाण केली. या घटनेत फिर्यादी शंकर इरकर यांच्यासह अशोक रामचंद्र इरकर, तानाजी बिरा टकले व दिलीप यशवंत नेमाने हे जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरून लाकडी दांडके व लोखंडी रॉड अशी शस्त्रे जप्त करण्यात आली असून दोन दुचाकी, एक मोपेड व एक प्लेझर दुचाकी वाहनाचा उल्लेख पंचनाम्यात आहे.

दि. २ मार्च २०२६ रोजी पहाटे १.३७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डी. जाधव करीत आहेत.

No comments:

Powered by Blogger.