Header Ads

लग्नाचे आमिष, धमक्या अन्‌ अत्याचार; तरुणाला अटक.

 लग्नाचे आमिष, धमक्या अन्‌ अत्याचार; तरुणाला अटक

----------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी : रहिम पिंजारी.

-------------------------------------

कोल्हापूर शहरात लग्नाचे आमिष दाखवून २४ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारात फयाज फिरोज शेख (वय २३, रा. केसापूर, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) असे अटकेत असलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत जुलै २०२२ ते एप्रिल २०२६ या कालावधीत शहरातील विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच, तिचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मानसिक छळ केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

या त्रासाला कंटाळून पीडितेने अखेर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९ व ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला.

दरम्यान, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला २९ एप्रिल २०२६ रोजी रात्री अटक केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोर करत आहेत.

या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे

No comments:

Powered by Blogger.