श्री मरीआई देवी यात्रा २०२६ उत्सवाची जय्यत तयारी; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
श्री मरीआई देवी यात्रा २०२६ उत्सवाची जय्यत तयारी; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
----------------------------------रोहित पास्ते मलकापूर प्रतिनिधी:
-------------------------------------
मलकापूर येथे सालाबादप्रमाणे श्री मरीआई देवी यात्रा उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शुक्रवारी दि. ०१ मे २०२६ (बुद्ध पौर्णिमा) रोजी सकाळी देवीची पालखी मिरवणूक व प्रतिष्ठापना होणार असून भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत श्री मरीआई मंदिर येथे हरिपाठ व प्रवचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ह.भ.प. श्री शिवाजी महाराज भोसले (सातारा-कोरेगाव) यांचे हरिपाठ व प्रवचन होणार असून कीर्तनासाठी ह.भ.प. श्री आनंदा महाराज (कोल्हापूर), ह.भ.प. श्री शिवलिंग साटे महाराज (शेळी) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच स्थानिक भजनी मंडळांचा सहभाग राहणार आहे.
शनिवारी दि. ०२ मे रोजी दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे भव्य बैलगाडी शर्यत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी २१,००० रुपये, द्वितीय १५,००० रुपये, तृतीय १०,००० रुपये तसेच इतर आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
रविवारी दि. ०३ मे रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध होम मिनिस्टर फेम चेतन हेगाजे यांच्या उपस्थितीत महिलांसाठी खास खेळ, शाल व पैठणी कार्यक्रम होणार आहे. यासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.
सोमवारी दि. ०४ मे रोजी ऑर्केस्ट्रा कार्यक्रम तसेच पुढील दिवसांत भजनी मंडळांचे कार्यक्रम, महाप्रसाद व हलगी-कुस्ती स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या संपूर्ण यात्रा उत्सवाचे आयोजन श्री मरीआई यात्रा कमिटी, मलकापूर यांच्या वतीने करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


No comments: