Header Ads

कुर्डू येथे भीम जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप रिपब्लिकन सेनेचा उपक्रम; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 कुर्डू येथे भीम जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप

रिपब्लिकन सेनेचा उपक्रम; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

----------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी.

संस्कार कुंभार.

-------------------------

कोल्हापूर दि. ३० एप्रिल २०२६ : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कुर्डू (ता. करवीर) येथील विद्या मंदिर शाळेत रिपब्लिकन सेना करवीरच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा क्रांतिकारक संदेश देणारे डॉ. आंबेडकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाच्या जोरावर समाजात समानतेचा लढा उभारला, असे मत निरंजन रजपूत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन सेना करवीरचे अध्यक्ष भीमराव गोंधळी होते. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे देशात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांची मूल्ये रुजली असून सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला, असे सांगितले.

यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ भोसले व तेजा कडपट्टी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध जिल्हास्तरीय परीक्षेत यश मिळवलेल्या शुभ्रा राजपूत, स्वरा पाटील, सई ढेरे व वीरेंद्रसिंह पाटील या विद्यार्थ्यांचा वही-पेन देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन विवेकानंद राजपूत यांनी केले होते. यावेळी अर्जुन गोंधळी (महासचिव), तानाजी पाटील, सखाराम कांबळे (सर), वैभव कुरडे (अध्यक्ष, आझाद तरुण मंडळ), प्रेम कांबळे, सुरज कांबळे तसेच शाळेचे शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकमेकांना भीम जयंतीच्या शुभेच्छा देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्धार व्यक्त केला.

No comments:

Powered by Blogger.