Header Ads

तळाशी (ता. राधानगरी) येथे मध्यरात्री दहशत; 30 जणांचा हल्ला, घर व वाहनांची तोडफोड

 तळाशी (ता. राधानगरी) येथे मध्यरात्री दहशत; 30 जणांचा हल्ला, घर व वाहनांची तोडफोड.

----------------------

राधानगरी प्रतिनिधी.

विजय बकरे.

--------------------

राधानगरी तालुक्यातील तळाशी गावात रविवारी (दि. 26 एप्रिल) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मोठा गोंधळ उडाला. सुमारे 20 ते 22 जणांच्या जमावाने ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या घरावर हल्ला करत दगडफेक व तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सदाशिव पांडुरंग चव्हाण (वय 63, रा. तळाशी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून टेम्पोमधून येत घराच्या गेटमध्ये जबरदस्ती प्रवेश केला. त्यांच्या हातात काठ्या, लोखंडी पाईप व दगड होते. आरोपींनी “जीवे ठार मारण्याची” धमकी देत घरावर दगडफेक केली व खिडक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

यावेळी फिर्यादींचा मुलगा उदयकुमार याच्यावरही काठीने हल्ला करून मारहाण करण्यात आली. तसेच बोलेरो (MH 09 CX 1555) गाडीच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले. दारात उभ्या असलेल्या तीन मोटरसायकलींचीही काठ्या व पाईपने तोडफोड करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता, जवळच उभ्या असलेल्या स्विफ्ट कार (MH 09 GA 7247) वरही हल्ला करून नुकसान करण्यात आले.

या प्रकरणी आयुष जाधव, रविंद्र जाधव, अजित जाधव, युवराज जाधव यांच्यासह 14 जणांची नावे निष्पन्न झाली असून अन्य 20 ते 22 जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी लोखंडी पाईप, काठ्या व दगडांचा वापर केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

या घटनेमुळे तळाशी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खोत करीत आहेत.

चौकट:-महत्त्वाचे: गावातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांकडून कडक कारवाईची मागणी होत आहे.

No comments:

Powered by Blogger.