Header Ads

आठ महिन्यांपासून फरार असलेला खुनाच्या प्रयत्नातील आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची धडाकेबाज कारवाई

 आठ महिन्यांपासून फरार असलेला खुनाच्या प्रयत्नातील आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची धडाकेबाज कारवाई.

पुसद प्रतिनिधी :

खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यात तब्बल आठ महिन्यांपासून फरार असलेला आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळच्या पथकाने शिताफीने अटक केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीविरोधात पोलिसांची कडक भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसंतनगर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा क्रमांक 280/2025 अंतर्गत कलम 109, 351(2), 351(3), 296, 3(5) भा.दं.वि. तसेच आर्म अॅक्ट कलम 3, 25 नुसार खुनाच्या प्रयत्नातील आरोपी मोहम्मद आवेज ऊर्फ तिड्डू मोहम्मद नजीर (वय 27, रा. पार्वती नगर, पुसद) हा 2025 पासून फरार होता.

दि. 24 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद उपविभागात फरार आरोपींचा शोध घेत असताना, संबंधित आरोपी गायमुखनगर रोड परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तात्काळ सापळा रचून अत्यंत शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याची ओळख पटल्यावर पुढील कारवाईसाठी त्याला वसंतनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी.जे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या यशस्वी मोहिमेत सपोनि धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह सायबर सेलच्या अधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग होता.

गुन्हेगारांवर पोलिसांचा वाढता दबाव

जिल्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे पोलिसांचे अभियान अधिक तीव्र झाले असून, अशा कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये धास्ती निर्माण होत आहे.

No comments:

Powered by Blogger.