Header Ads

ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय व ग्रामस्थांच्या बनाची वाडी गाव व्यसनमुक्त करण्याचा निर्णय.

 ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय व ग्रामस्थांच्या बनाची वाडी गाव व्यसनमुक्त करण्याचा निर्णय.

---------------------------------

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

---------------------------------

राधानगरी तालुक्यातील बनाची वाडी येथील ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय व ग्रामस्थांच्या वतीने बनाची वाडी गाव व्यसनमुक्त करण्याचा निर्णय ग्रामपंचायत हॉलमध्ये,घेण्यात आला घेण्यात आला अशी माहिती वकील विजय धनवडे यांनी दिली


बनाची वाडी येथील ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय व ग्रामस्थ ग्रामपंचायत यांच्यावतीने ग्रामपंचायत च्या हॉलमध्ये ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली त्यामध्ये भारत अभियान अंतर्गत बनाचीवाडी गाव व्यसनमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर गावातील महिलांनी आपापल्या दारामध्ये अतिशय सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या त्यासाठी ज्या महिलेने आपल्या दारात उत्कृष्ट रांगोळी काढली आहे त्याचे परीक्षण करून त्या महिलांना बक्षीस तासगावच्या ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या डॉक्टर वैशाली बहिण जी यांच्या हस्ते व गावातील अनेक युवक शासकीय पदावर नियुक्ती झालेल्या त्यांच्या आई-वडिलांचा ईश्वरीय संदेश देऊन सत्कार करण्यात आला

या कार्यक्रमास राधानगरी उपसेवा केंद्राच्या संचालिका जयश्री बहिण जी जयवंत धनवडे अनंत गुरव भाई सामाजिक कार्यकर्ते जयवंत पताडे तसेच ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य शाळेचे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने हजर होता 

शेवटी आभार एडवोकेट विजय धनवडे यांनी मानले

No comments:

Powered by Blogger.