Header Ads

विश्वासराव रणसिंग इंग्लिश मीडियम स्कूलचे उद्घाटन; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नवे शैक्षणिक दालन खुले.

 .

विश्वासराव रणसिंग इंग्लिश मीडियम स्कूलचे उद्घाटन; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नवे शैक्षणिक दालन खुले.

----------------------------------

इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे .

----------------------------------

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान निमसाखर संस्थेने शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा गाठत इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागात कळंब येथे विश्वासराव रणसिंग इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केले आहे.या स्कूल चे उद्घाटन इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान च्या अध्यक्षा आनंदी रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्था उपाध्यक्ष प्रकाश कदम,सचिव विरसिंह रणसिंग,विश्वस्त शंकरराव रणसिंग,विश्वस्त कुलदीप हेगडे,विश्वस्त राही रणसिंग,विद्याचरण पुरंदरे,प्राचार्य डॉ अशोक काळंगे,उपप्राचार्य डॉ प्रशांत शिंदे ,प्रा.ज्ञानेश्वर गुळीग ,मुख्याध्यापक प्रमोद भोंग इ मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विश्वासराव दादा रणसिंग यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. 

उद्घाटन प्रसंगी संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, तसेच इंग्रजी माध्यमातून जागतिक स्पर्धेत टिकून राहण्याची क्षमता निर्माण करणे हा संस्थेचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले.आजच्या काळात इंग्लिश माध्यमाचे शिक्षण अत्यंत गरजेचे बनले आहे.ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी केवळ भाषेच्या अडचणीमुळे मागे पडतात. ही दरी कमी करण्यासाठी अशा शाळांची आवश्यकता असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि रोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात प्राचार्य डॉ अशोक काळंगे  मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांनी शिस्त, परिश्रम आणि सातत्य यांचा अंगीकार करून यशस्वी होण्याचे आवाहन केले. तसेच पालकांनीही आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.विद्याचरण पुरंदरे यांनी या नवीन इंग्लिश मीडियम स्कूलमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रशांत शिंदे व आभार प्रा.ज्ञानेश्वर गुळीग यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रा.सुहास भैरट,प्रा.रामचंद्र पाखरे,प्रा.विलास बुवा,प्रा.ज्योस्त्ना गायकवाड,प्रा.विनायक शिंदे इ मान्यवर, शिक्षकवृंद,पालक उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.