Header Ads

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल आमदार रोहित पवार यांचा सत्कार

 समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल आमदार रोहित पवार यांचा सत्कार.

------------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे.

---------------------------------------

विधानसभेच्या अधिवेशनात पंचतारांकित प्रश्न मांडून समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देणाऱ्या आमदार रोहित पवार यांचा आरोग्य संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

१६ जानेवारी २०२३ रोजी राज्य आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. संग्राम शिंदे यांनी पगार व कामाच्या अटींसंदर्भात राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. यावेळी आमदार रोहित पवार यांनी डॉ. शिंदे यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन विधानसभेत पंचतारांकित प्रश्न उपस्थित केला.

या पाठपुराव्यामुळे समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे पगार व मानधन वेळेवर मिळण्यास सुरुवात झाली, तसेच बदली प्रक्रियेलाही गती मिळाली. त्यामुळे राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या पार्श्वभूमीवर समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीने डॉ. संग्राम शिंदे यांच्या हस्ते आमदार रोहित पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. संदीप प्रधान, डॉ. रणजित पाटील, डॉ. योगेश कदम, डॉ. ज्योती भोईटे आदी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.