Header Ads

शिवसुष्टी शिक्षण संस्थेचा भविष्यात वटवृक्ष होईल : सागर धुंदरे

 शिवसुष्टी शिक्षण संस्थेचा भविष्यात वटवृक्ष होईल : सागर धुंदरे

------------------------------------

राधानगरी / प्रतिनिधी विजय बकरे.

-------------------------------------

शैक्षणिक शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राचा भक्कम पाया घालणारी शिवसुष्टी शिक्षण संस्था भविष्यात निश्चितच वटवृक्षात रूपांतरित होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सागर धुंदरे यांनी केले.

राशिवडे-म्हालसवडे मार्गावरील शिवसुष्टी विद्या संकुल येथे आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजनाने पंचायत समिती सदस्य अमृता पाटील यांच्या हस्ते झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन सागर धुंदरे व मधुकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिवसुष्टी विद्या संकुलतर्फे वर्षभर कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

व्याख्याते मधुकर पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चौफेर शिक्षणाची गरज अधोरेखित करत, अशा संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देणे आवश्यक असल्याचे सांगितले. जागतिक स्तरावर शिक्षणाचे वाढते महत्त्व लक्षात घेता पालकांनी मुलांच्या शिक्षणात योग्य गुंतवणूक करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात पंचायत समिती सदस्य अमृता पाटील व संस्थापक अक्षय वरपे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत संस्थापक अक्षय वरपे यांनी केले, तर प्रास्ताविक मुख्याध्यापिका शीतल ढोकरे यांनी मांडले. सूत्रसंचालन प्राजक्ता पाटील यांनी केले आणि आभार वर्षा ओंबळकर यांनी मानले.

यावेळी पंचायत समिती सदस्य निवास पाटील, बाचणी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संपतराव पाटील, भोगावती येथील कार्यालयीन अधीक्षक नामदेव जाधव, पांडुरंग वरपे, पंढरी भोपळे, डॉ. काजल वरपे, माणिक पाटील, सुमित्रा सातार, ऋतुजा कुंभार, विश्वास ढोकरे, चंद्रकांत ताडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.