महाराणा प्रताप चौकात घराचा स्लॅब कोसळला; दोन कामगार जखमी
महाराणा प्रताप चौकात घराचा स्लॅब कोसळला; दोन कामगार जखमी
--------------------
शशिकांत कुंभार.
---------------------
कोल्हापूर शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरात एका जुन्या घराच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान स्लॅब कोसळून दोन कामगार जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.
आरिफ मुल्ला यांच्या राहत्या घरात सध्या दुरुस्तीचे काम सुरू होते. काम सुरू असतानाच अचानक स्लॅब कोसळला आणि त्याखाली दोन कामगार अडकले. घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले.
स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. स्वप्निल खुराडे आणि वैभव कदम अशी जखमींची नावे असून, त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच, घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

No comments: