Header Ads

आटपाडीतील थरारक जबरी चोरीचा अवघ्या 72 तासांत पर्दाफाश; वृद्धेची सोन्याची माळ हिसकावून मुलावर चाकू हल्ला करणारे तिघे जेरबंद

 आटपाडीतील थरारक जबरी चोरीचा अवघ्या 72 तासांत पर्दाफाश; वृद्धेची सोन्याची माळ हिसकावून मुलावर चाकू हल्ला करणारे तिघे जेरबंद



सांगली | प्रतिनिधी : राजू कदम

आटपाडी तालुक्यातील पळसखेल येथील कुचेकरवस्तीमध्ये घडलेल्या धक्कादायक जबरी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या तीन दिवसांत छडा लावत तीन सराईत आरोपींना अटक केली आहे. वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ जबरदस्तीने हिसकावून तिच्या मुलावर चाकूने जीवघेणा हल्ला करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.

२१ सप्टेंबर रोजी गोपनीय माहितीच्या आधारे आटपाडी-दिघंची मार्गावरील कारखानापाटी येथील ए.जे. हॉटेलसमोर सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अटक आरोपी

सोमनाथ मल्हारी चव्हाण (वय २३)

राजू प्रल्हाद काळेल (वय ३१)

महादेव ऊर्फ प्रसाद श्रीकांत बुधावले (वय १९)

सर्व रा. परकुटे, मलवडी, ता. माण, जि. सातारा.

जप्त मुद्देमाल

- सुमारे ₹60 हजार किमतीचे 49 सोन्याचे लहान मणी (सोन्याच्या माळेतील).

या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 339/2026 भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 309(6), 333 आणि 3(5) अंतर्गत दाखल आहे. आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.