हद्दपारीचा आदेश धुडकावला! कुपवाडमध्ये रात्री फिरणारा हद्दपार आरोपी MIDC पोलिसांच्या जाळ्यात.
हद्दपारीचा आदेश धुडकावला! कुपवाडमध्ये रात्री फिरणारा हद्दपार आरोपी MIDC पोलिसांच्या जाळ्यात.
---------------------------
मिरज-कुपवाड प्रतिनिधी
राजू कदम
---------------------------
सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीने आदेशाचे उल्लंघन करून कुपवाडमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता कुपवाड येथील तराळ गल्ली परिसरात गस्तीदरम्यान राहुल सुभाष माने (वय ३२, रा. गणपती मंदिरासमोर, बामनोळी, कुपवाड) हा संशयास्पदरीत्या आढळून आला.
चौकशीअंती उपविभागीय दंडाधिकारी, मिरज यांनी ११ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार राहुल माने याला सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता तो पुन्हा सांगली जिल्ह्यात प्रवेश करून कुपवाडमध्ये फिरताना आढळला.
या प्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 223/2026 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 142 अन्वये दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण ईश्वरा मोहिते यांनी दिली असून, गुन्हा पोलीस हेड कॉन्स्टेबल मुळीक यांनी नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल निंबाळकर करीत आहेत.

No comments: