Header Ads

भरधाव अज्ञात वाहनाचा काळाचा घाव! मिरज–पंढरपूर रोडवर महिलेचा जागीच मृत्यू; कुपवाड MIDC पोलिसांचा तपास सुरू.

 भरधाव अज्ञात वाहनाचा काळाचा घाव! मिरज–पंढरपूर रोडवर महिलेचा जागीच मृत्यू; कुपवाड MIDC पोलिसांचा तपास सुरू.

----------------------------------

मिरज-कुपवाड  प्रतिनिधी 

 राजू कदम

----------------------------------

मिरज–पंढरपूर रोडवर कुपवाड MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (२० सप्टेंबर) पहाटे झालेल्या भीषण अपघातात अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.



घटनेची माहिती मिळताच आयुष हेल्पलाइन टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. टीम प्रमुख अविनाश पवार यांच्या नेतृत्वाखाली चिंतामणी पवार, ओंकार गुदगुडे, रोहन कांबळे आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी महिलेला तात्काळ मिरज शासकीय (सिव्हिल) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर महिलेला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

अपघाताची माहिती मिळताच कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व अन्य पुराव्यांच्या आधारे वाहनाचा शोध सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.