Header Ads

गुलाम नबी आझाद कॉलेज पुसद मध्ये बक्षीस वितरण समारंभ आयोजित

 गुलाम नबी आझाद कॉलेज पुसद मध्ये बक्षीस वितरण समारंभ आयोजित .

------------------------

पुसद तालुका प्रतिनिधी.

सिद्धार्थ कदम.

---------------------------

दिनांक: 23/04/2026 

रोजी गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड आर्ट्स पुसद मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा 03 अंतर्गत घेण्यात आलेल्या वेग वेगळ्या उपक्रमाबद्दल सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षा फराह दिबा मॅडम होत्या तर प्रमुख म्हणून बिल्कीस मॅडम, तारिक अहेमद सर होते तर आयोजक मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचे नोडल अधिकारी सैय्यद सलमान सर होते. यामध्ये अभियाना अंतर्गत निबंध स्पर्धा,वारली चित्रकला स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, हस्तकला स्पर्धा, आदर्श विद्यार्थी स्पर्धा आशा वेगवेगळ्या उपक्रमाचे बक्षीस प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकानुसार देण्यात आले.

बक्षीस मिळाल्या नंतर विद्यार्थी खूपच आनंदित झाले आणि उत्साहपूर्ण मनोगत व्यक्त केले.आशा प्रकारच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे विकास होतो व त्यांच्या कलागुणांना वाव मिळते. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि प्रोत्साहना करिता ठेवण्याला या बक्षीस वितरण समारंभ करिता शाळेचे मुख्याधापक मोहम्मद सादिक शेख सरांनी नोडल ऑफिसर सैय्यद सलमान सरांचे या कार्याचे कौतुक केले आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.

No comments:

Powered by Blogger.