Header Ads

साताऱ्यात खुनाचा कट उधळला; पिस्टलसह ३.२६ लाखांचा शस्त्रसाठा जप्त.

 साताऱ्यात खुनाचा कट उधळला; पिस्टलसह ३.२६ लाखांचा शस्त्रसाठा जप्त.

-----------------------------------

सातारा प्रतिनिधी :अमर इंदलकर

 -------------------------------------

जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून पिस्टलसह मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे संभाव्य खुनाचा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, करण चव्हाण (रा. डबेवाडी, ता. जि. सातारा) हा जुन्या वैरातून काही युवकांच्या खुनाचा कट रचत असल्याची माहिती समोर आली होती.

या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या पथकाने डबेवाडी येथील शुरवीर करिअर अकॅडमी परिसरात सापळा रचला. संशयितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले.

या कारवाईदरम्यान आरोपीकडून २ देशी बनावटीच्या पिस्टल, ५ जिवंत काडतुसे, १ सुरा, २ कुकरी, २ मोबाईल हँडसेट आणि मोटारसायकल असा एकूण ३ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३, हत्यार अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले.

No comments:

Powered by Blogger.