निवडे ग्रामीण आरोग्य सेवेचा दर्जा सुधारणार.. जि प सदस्य सोनाली विलास पाटील.
निवडे ग्रामीण आरोग्य सेवेचा दर्जा सुधारणार..
जि प सदस्य सोनाली विलास पाटील
-------------------------------------कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे.
------------------------------------- प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) निवडे या "ग्रामीण आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यावर आम्ही भर देणार असे जि प सदस्य सोनाली विलास पाटील अचानक दिलेला भेटी प्रसंगी बोलताना व्यक्त केले प्राथमिक आरोग्य केंद्राने स्थानिकांना मूलभूत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास चांगली कामगिरी केली आहे, परंतु काही छोटे सुधारणेचे आणि आवश्यक उपकरणांच्या बाबतीत काम करणे गरजेचे असून लवकरच आवश्यक उपकरणे, औषधे आणि कर्मचारी सुविधांसाठी तातडीने कारवाई करण्यात येईल. असे जि प सदस्य सौ सोनाली पाटील यांनी यावेळी सांगितले तसेच नियमित आरोग्य तपासणी व मोफत औषध पुरवठा होतो का नाही याकडे काळजीने लक्ष देणार असून रुग्णांना काळजी घेण्याचे आश्वासन, देण्यात आले अचानक दिलेल्या जि प सदस्य सोनाली पाटील यांनी निवडे आरोग्य केंद्र भेट दिल्यामुळे आरोग्य केंद्राचे धाबे दणाणले
यावेळी डॉ, श्रीमती डॉ, नयना शेलार , अर्जुन इंगळे विस्ताराधिकारी तालुका कार्यालय पंचायत समिती गगनबावडा, आरोग्य सहायिका आसाम नदाफ ,परिचारिका रेखा, तसेच उत्तम पाटील, नितीन राबाडे, अभिमन्यू बारड, आनंदा पडवळ आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते.

No comments: