कोल्हापुरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून सुरू होता अवैध व्यवसाय; करवीर पोलिसांची धडक कारवाई..
कोल्हापुरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून सुरू होता अवैध व्यवसाय; करवीर पोलिसांची धडक कारवाई..
कोल्हापूर जिल्ह्यात व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या कथित हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा करवीर पोलिसांनी भांडाफोड केला आहे. वाशी गावच्या हद्दीतील 'सनराईज लॉजिंग'वर टाकलेल्या छाप्यात एका महिलेची सुटका करण्यात आली असून, दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर तिघे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या अवैध व्यवसायांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला.
्प्राथमिक तपासानुसार, 'सनराईज लॉजिंग' येथे पुणे व मुंबई येथून महिलांना बोलावून त्यांचे फोटो व्हॉट्सअॅपद्वारे ग्राहकांना पाठवले जात होते. त्यानंतर ग्राहकांकडून संपर्क साधून कथित अवैध व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
११ जुलै २०२६ रोजी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून माहितीची खातरजमा केली. त्यानंतर लॉजिंगवर छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली. कारवाईदरम्यान ६,९०० रुपये रोख, चार मोबाईल, ७२ निरोधची पाकिटे तसेच रजिस्टर आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली.
या प्रकरणात सागर प्रभाकर कांबळे (रा. मिणचे बुद्रुक, ता. भुदरगड) आणि कमलेश कृष्णा पाटील (रा. हेळेवाडी, ता. राधानगरी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर शहाजी एकनाथ वैद्य उर्फ सागर पाटील, सुहास निचीते आणि विक्रम दिनकर कांबळे हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
तपासात आरोपी शहाजी वैद्य याने "सागर पाटील फ्रेंड सर्कल" नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून या कथित अवैध व्यवसायाचे जाळे उभे केल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८६/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम १४३(२) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ मधील कलम ३, ४, ५ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक सुहास पवार आणि त्यांच्या पथकाने केली.



No comments: