पिंपरी थुगांव येथे जनावरांसाठी वंधत्व निवारण व लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
पिंपरी थुगांव येथे जनावरांसाठी वंधत्व निवारण व लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न.
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र | चांदूरबाजार (अमरावती)
चांदूरबाजार तालुक्यातील पिंपरी थुगांव येथे दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी पशुवैद्यकीय चिकित्सालय कुह्या देशमुख यांच्या वतीने गावातील जनावरांसाठी वंधत्व निवारण व लाल्या-खुरकूत (तोंडखुरी-पायखुरी) लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव हगोणे, मऱ्हाट-वऱ्हाड डेअरीचे डॉ. ज्ञानेश्वर गावंडे, एरिया मॅनेजर हेमंत निवाळ, सुपरवायझर संकेत सावलकर, मैत्री AIT चे अभिजीत वानखडे व विनय किटुकले, तसेच NDDB चे श्री. गाडगे उपस्थित होते. यावेळी पिंपरी थुगांव येथील ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
शिबिरादरम्यान गावातील जनावरांची वंधत्व तपासणी व उपचार करण्यात आले. तसेच गोठ्यांमध्ये जाऊन जनावरांना तोंडखुरी-पायखुरी रोगावरील लसीकरण करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पशुसखी शालिनीताई ढोणे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रतीक खापरे, मयूर खापरे, अंकुश खापरे, रोहित खापरे आणि मंगेश धुशे यांनी विशेष सहकार्य केले.
या कार्यक्रमासाठी तालुका पशुसंवर्धन अधिकारी, चांदूरबाजार तसेच जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी, अमरावती यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिबिरामुळे गावातील पशुपालकांना जनावरांच्या आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण सेवा व मार्गदर्शन मिळाले.

No comments: