धक्कादायक! वायडर मेमोरिअल चर्चसमोर अपघात; 46 वर्षीय महिलेचा मृत्यू
धक्कादायक! वायडर मेमोरिअल चर्चसमोर अपघात; 46 वर्षीय महिलेचा मृत्यू.
कोल्हापूर | प्रतिनिधी
कोल्हापूर शहरातील वायडर मेमोरिअल चर्चसमोर रविवारी सकाळी झालेल्या दुचाकी अपघातात पुनम रामेश्वर शिंदे (वय 46, रा. कनाननगर, कोल्हापूर) यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरून जात असताना त्यांचा अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात मयत रजिस्टर क्र. 135/2026 अन्वये BNSS कलम 194 अंतर्गत नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

No comments: