Header Ads

पश्चिम घाटात मुसळधार पावसाचा जोर; राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला, भोगावती नदीत १,४२८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू..

 पश्चिम घाटात मुसळधार पावसाचा जोर; राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला, भोगावती नदीत १,४२८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू.



राधानगरी | प्रतिनिधी : विजय बकरे

पश्चिम भागात गेल्या पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर गेली दोन दिवसापासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वेगाने वाढली आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा आज दुपारी २ वाजून २६ मिनिटांनी उघडण्यात आला.

या दरवाजातून १,४२८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू झाला आहे. धरणातून होणाऱ्या या विसर्गासह एक जून ते २१ सप्टेंबर २०२६ अखेर एकूण विसर्ग ४,२६४ क्यूसेक झाला असल्याची माहिती जलसंपदा विभाग, राधानगरी यांनी दिली.


जलसंपदा विभागाने भोगावती नदीकाठच्या गावांतील नागरिक व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्रात अनावश्यक वावर टाळावा तसेच जनावरे व शेतीची साधने सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र नागरिकांना अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करते.

No comments:

Powered by Blogger.