Header Ads

आटपाडीतील पोक्सो प्रकरणात ऐतिहासिक निकाल; 70 वर्षीय आरोपीला जन्मठेप, 3.40 लाखांचा दंड

 आटपाडीतील पोक्सो प्रकरणात ऐतिहासिक निकाल; 70 वर्षीय आरोपीला जन्मठेप, 3.40 लाखांचा दंड.

------------------------------------------

सांगली | प्रतिनिधी.राजू कदम.

-------------------------------------

सांगली जिल्ह्यातील आटपाडी पोलीस ठाण्यात 2018 मध्ये दाखल झालेल्या बलात्कार व पोक्सो प्रकरणात विटा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत 70 वर्षीय आरोपी शिवाजी कोंडीबा काळेल (रा. काळेलवस्ती, गळवेवाडी, ता. आटपाडी) याला जन्मठेपेची शिक्षा आणि 3 लाख 40 हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. दंड न भरल्यास 15 महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार आहे.

न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 376(1), 376(AB) तसेच पोक्सो कायदा 2012 अंतर्गत आरोपीला दोषी ठरवले.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांनी केला. तपासात सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सुनावणीदरम्यान सरकारी वकील अॅड. आरती महानंद देशपांडे-साटविलकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. डॉक्टर, शिक्षिका, फिर्यादी, दोन्ही पीडित मुली आणि तपासी अधिकारी अशा एकूण 10 साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयाने महत्त्वाच्या मानल्या.

पोलिसांच्या पाठपुराव्याला यश

या खटल्यात तत्कालीन तपासी अधिकारी सुधाकर देडे, सध्याचे आटपाडी पोलीस निरीक्षक संतोष पवार, कोर्ट पैरवी अधिकारी, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण मोहन गुरव तसेच इतर पोलिसांनी साक्षीदारांचे समन्वय, संरक्षण आणि न्यायालयीन पाठपुरावा प्रभावीपणे केल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला.

15 सप्टेंबर 2026 रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, विटा येथील न्यायमूर्ती आर. आर. भागवत यांनी आरोपीला जन्मठेप आणि 3.40 लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

No comments:

Powered by Blogger.