Header Ads

लाइट स्ट्रक्चर अडकलं अन् पोलिस निरीक्षकांनीच धरलं ट्रॅक्टरचं स्टेअरिंग..मिरजेत गणेश मिरवणुकीदरम्यान किरण चौगले यांची 'खाकी'सोबत माणुसकीची झलक.....

 लाइट स्ट्रक्चर अडकलं अन् पोलिस निरीक्षकांनीच धरलं ट्रॅक्टरचं स्टेअरिंग..मिरजेत गणेश मिरवणुकीदरम्यान किरण चौगले यांची 'खाकी'सोबत माणुसकीची झलक

-------------------------

राजू कदम. 

----------------------

मिरज : गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान मार्गात लाइट स्ट्रक्चर अडकल्याने काही काळ मिरवणुकीच्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेत मिरज सिटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण चौगले यांनी वेळ न दवडता स्वतः पुढाकार घेतला.

अडथळा दूर करण्यासाठी त्यांनी स्वतः ट्रॅक्टरचे स्टेअरिंग हातात घेत ट्रॅक्टर चालवला आणि रस्त्यात अडकलेले लाइट स्ट्रक्चर बाजूला करून मिरवणुकीचा मार्ग मोकळा केला. पोलिस निरीक्षकांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे मिरवणुकीचा खोळंबा टळला आणि उत्सवाचा उत्साह कायम राहिला.कायद्याची अंमलबजावणी करण्यासोबतच प्रसंगी प्रत्यक्ष मैदानात उतरून नागरिकांना सहकार्य करणाऱ्या चौगले यांच्या या कृतीचे उपस्थित नागरिक व गणेशभक्तांकडून कौतुक होत आहे.

अधिकारी म्हणून आदेश देण्यापेक्षा गरजेच्या वेळी स्वतः पुढे होणे' या कृतीतून पोलिसिंगमधील माणुसकीचा आदर्श पाहायला मिळाला.

No comments:

Powered by Blogger.