Header Ads

पुसद येथे जाधव परिवाराचा पर्यावरणपूरक व आदर्श उपक्रम: आईच्या अस्थी-रक्षेत आंबा व जांभळाचे झाड लावून जपल्या स्मृती

 पुसद येथे जाधव परिवाराचा पर्यावरणपूरक व आदर्श उपक्रम: आईच्या अस्थी-रक्षेत आंबा व जांभळाचे झाड लावून जपल्या स्मृती.


----------------------

सिद्धार्थ कदम

पुसद तालुका प्रतिनिधी.

--------------------------

पुसद (जि. यवतमाळ):

आईच्या निधनानंतर परंपरेनुसार अस्थी व रक्षा नदीत विसर्जित न करता, त्या पवित्र रक्षेमध्ये आंबा आणि जांभूळ या दोन वृक्षांची लागवड करून आईला हिरवाईच्या रूपात कायमस्वरूपी जिवंत ठेवण्याचा एक अत्यंत स्तुत्य व पर्यावरणपूरक संकल्प पुसद येथील ‘माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन’चे अध्यक्ष तथा वृक्षप्रेमी गजानन जाधव व त्यांच्या परिवाराने केला. या अनोख्या उपक्रमाचे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

गजानन जाधव यांच्या मातोश्री स्व. शांताबाई दत्तात्रय जाधव यांचे नुकतेच निधन झाले. मृत्यूनंतर नदीचे प्रदूषण टाळत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यांनी रक्षा विसर्जन नदीत न करता, 'एक पेड माँ के नाम' या संकल्पनेतून थेट वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रक्षा सावडल्यानंतर त्याच पवित्र रक्षेमध्ये आंबा व जांभळाच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.

या प्रेरणादायी उपक्रमाला 'माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद', 'मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्था' व 'वसुंधरा बहुउद्देशीय संस्था' रुग्णमित्र फाउंडेशन, समाजकार्य महाविद्यालय, या संघटनांनी पाठबळ दिले . सर्व नातेवाईक, निसर्गप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या पर्यावरणपूरक रक्षा सावडणे व वृक्षारोपण कार्यक्रमास  उपस्थित राहून पर्यावरण संवर्धन करण्याचा अनोखा संदेश दिला.

यावेळी जाधव कुटूंबियांचे आप्तेष्ट, मित्रमंडळी, विविध सामाजिक संस्था संघटना चे प्रतिनिधी उपस्थित होते.

यात श्री दत्तात्रेय जाधव, संतोष जाधव, गजानन जाधव, त्यांच्या भगिनी,रमेश डंबोळे सर, पवन बोजेवार, प्रा धनंजय कोठाळे, अनंता चतुर ,जय जाधव 

यांची प्रमुख उपस्थिती लाभली

No comments:

Powered by Blogger.