कोल्हापुरात गणेशमूर्ती आगमनासाठी विशेष वाहतूक नियोजन; शाहूपुरी पोलिसांचे भक्तांना सहकार्याचे आवाहन .
कोल्हापुरात गणेशमूर्ती आगमनासाठी विशेष वाहतूक नियोजन; शाहूपुरी पोलिसांचे भक्तांना सहकार्याचे आवाहन .
प्रतिनिधी : रहिम पिंजारी.
-------------------------------
कोल्हापूर:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील बापट कॅम्प आणि शाहूपुरी कुंभार गल्ली परिसरातून गणेशमूर्ती घेऊन जाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, प्रशासनाकडून विशेष वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आज दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक व्यवस्था निश्चित केली आहे.वाहतूक सुरळीत राहण्यासाठी शाहूपुरी पोलिसांनी पुढीलप्रमाणे नियमावली जाहीर केली आहे
बापट कॅम्प परिसर: गणेशमूर्ती घेण्यासाठी येणारी सर्व वाहने जाधववाडी मार्गे बापट कॅम्पकडे प्रवेश करतील. मूर्ती घेतल्यानंतर ही वाहने शिरोली टोल नाका मार्गे बाहेर पडतील.शाहूपुरी कुंभार गल्ली परिसर: मूर्ती घेण्यासाठी येणारी वाहने माजी नगरसेवक श्री. प्रकाश नाईकनवरे यांच्या घरासमोरील चौकातून प्रवेश करतील. मूर्ती घेतल्यानंतर ही वाहने नाईक अँड नाईक कंपनी येथून बाहेर पडतील.प्रवेश बंदी: नाईक अँड नाईक कंपनी आणि आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलकडून कुंभार गल्लीच्या दिशेने कोणत्याही वाहनाला प्रवेश दिला जाणार नाही.चारचाकी वाहनांचा वापर टाळा: घरगुती गणेशमूर्ती घेण्यासाठी येणाऱ्या गणेशभक्तांनी शक्यतो चारचाकी वाहनांचा वापर टाळावा, जेणेकरून परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल आणि सार्वजनिक मंडळांना मूर्ती नेणे सोपे जाईल.हा वाहतूक बदल गणेशभक्तांची सुरक्षितता आणि सुव्यवस्थेसाठी करण्यात आला असून, सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भक्तांनी पोलीस प्रशासनाने निश्चित केलेल्या मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन शाहूपुरी पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.

No comments: