Header Ads

कोल्हापुरात ४ सराईत गुन्हेगारांना २ वर्षांसाठी जिल्हापार; जुना राजवाडा पोलिसांची मोठी कारवाई.

कोल्हापुरात ४ सराईत गुन्हेगारांना २ वर्षांसाठी जिल्हापार; जुना राजवाडा पोलिसांची मोठी कारवाई.




--------------------------------

प्रतिनिधी : रहिम पिंजारी.

_____________________

कोल्हापूर:जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्याने एक मोठी कारवाई केली आहे. रेकॉर्डवरील शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ४ सराईत गुन्हेगारांना कोल्हापूर जिल्ह्यातून २ वर्षांकरिता हद्दपार (तडीपार) करण्यात आले आहे. या आदेशाची बजावणी १२ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आली आहे.हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:विशाल बबन जाधव उर्फ मांगुरे (वय ३१, रा. सुभाषनगर, सध्या प्रगती नगर, पाचगाव)निखिल शशिकांत लोहार (वय ३२, रा. ए वॉर्ड, वेताळ तालीम, शिवाजी पेठ)सुशांत उर्फ पेंद्या महेश सरनाईक-कांबळे (वय ३०, रा. ए वॉर्ड, फिरंगाई मंदिराजवळ, शिवाजी पेठ)राहुल शामराव चौगुले (वय ३०, रा. जुना गुरांचा बाजार, ८ नंबर शाळा, तिरंगा चौक, शिवाजी पेठ)कारवाईची पार्श्वभूमी:या सराईत गुन्हेगारांवर खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, खंडणी, आणि गर्दीमारामारी यांसारखे शरीराविरुद्ध व मालाविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल होते. त्यामुळे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६(१)(अ)(ब) अन्वये हद्दपारीचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला होता.उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर उपविभाग) यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय न्याय दंडाधिकारी (करवीर) यांच्याकडे झालेल्या सुनावणीअंती या चारही गुन्हेगारांना २ वर्षांसाठी जिल्हापार करण्याचे आदेश पारित करण्यात आले.

No comments:

Powered by Blogger.