रमाई दूध संस्थेकडून विठ्ठल-रुक्मिणींचा अभिषेक; मांडूकलीत भक्तिमय वातावरण
रमाई दूध संस्थेकडून विठ्ठल-रुक्मिणींचा अभिषेक; मांडूकलीत भक्तिमय वातावरण.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गगनबावडा तालुक्यातील मांडूकली येथील रमाई सहकारी दूध संस्थेच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात धार्मिक विधी आणि अभिषेक सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तीचा विधिवत अभिषेक करून पूजा-अर्चा केली. या सोहळ्यामुळे मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
यावेळी संस्थेचे चेअरमन वैभव केरबा कांबळे, व्हाइस चेअरमन सहदेव सिताराम कांबळे, संचालक प्रवीण सहदेव कांबळे, केरबा दत्तू कांबळे, सहदेव भाऊ कांबळे, महादेव सिताराम कांबळे तसेच संचालिका शोभा सहदेव कांबळे, रेश्मा महादेव कांबळे, सुनंदा केरबा कांबळे, निशा वैभव कांबळे, सोनाली सहदेव कांबळे, अश्विनी राजेश कांबळे, उज्वला गणपती कांबळे उपस्थित होत्या.
याशिवाय ह.भ.प. तानाजी पाटील महाराज, तायाप्पा पाटील, विजय पाटील, धनाजी पाटील, दीपक शिंदे, संभाजी पाटील, आनंदा कापडे यांच्यासह दूध उत्पादक सभासद, वारकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
अभिषेकानंतर भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणींचे दर्शन घेतले. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे गावात भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला गेला. धार्मिक व सामाजिक उपक्रम सातत्याने राबविणाऱ्या रमाई सहकारी दूध संस्थेच्या कार्याचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

No comments: