Header Ads

कृषिदूतांचे इस्पुर्ली गावात उत्साहात आगमन; 'रावे' (RAWE) कार्यक्रमांतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांना सुरुवात

 कृषिदूतांचे इस्पुर्ली गावात उत्साहात आगमन; 'रावे' (RAWE) कार्यक्रमांतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांना सुरुवात.


इस्पुर्ली, दि. ११जुलै २०२७:महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील बी.एस्सी. (कृषी) अंतिम वर्षातील कृषिदूतांचे इस्पुर्ली (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथे दि. १७ मे २०२७ रोजी उत्साहात आगमन झाले.

'ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव (RAWE)' कार्यक्रमांतर्गत पुढील काही आठवडे कृषिदूत विद्यार्थी विशाल माळी, मंगलसिंग पाटील, शितल माळी, धैर्यशील माने, यशराज मोरे आणि ऋषिकेश नरुटे हे गावात वास्तव्यास राहून शेतकरी बांधवांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती, मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके देणार आहेत.

या कालावधीत कृषिदूतांतर्फे गावात खालील महत्त्वपूर्ण उपक्रम आणि प्रात्यक्षिके राबविली गेली आहेत :

सामाजिक-तांत्रिक-आर्थिक सर्वेक्षण,माती नमुना चाचणी आणि विश्लेषण,शून्य ऊर्जा शीतगृह (Zero energy cool chamber),मूल्यवर्धित उत्पादनांचे प्रात्यक्षिक (Demonstration of value addition products),जीवामृत निर्मिती व वापर,पीक उत्पादनासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर 

या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील शेतीची प्रत्यक्ष माहिती मिळणे, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणे आणि विद्यापीठातील संशोधनाधारित तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविणे हा आहे.

इस्पुर्ली ग्रामपंचायत, गावातील प्रशासक श्रीमती.मेघ चेतन चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी  श्रीमती.योजना शंकर जंगम ग्रामपंचायत प्रशासकीय समिती आणि शेतकरी बांधवांनी कृषिदूतांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. या उपक्रमाला महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. एस. कांबळे, कार्यक्रम समन्वयक डॉ. बी. टी. कोलगणे, डॉ. एस. के. जाधव, कार्यक्रम अधिकारी डॉ. वर्षा गायकवाड व विषयतज्ज्ञ प्राध्यापकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे.

*“ज्ञान, विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इस्पुर्ली गावातील शेती विकासाला नवी दिशा देण्यासाठी कृषिदूत सज्ज!”*

No comments:

Powered by Blogger.