Header Ads

कलेक्टर कार्यालयासमोर गळफास आंदोलनाचा थरार!; बेकायदेशीर मायक्रो फायनान्स व सावकारीविरोधात जयभीम क्रांती सेनेचा एल्गार

 कलेक्टर कार्यालयासमोर गळफास आंदोलनाचा थरार!; बेकायदेशीर मायक्रो फायनान्स व सावकारीविरोधात जयभीम क्रांती सेनेचा एल्गार.



फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र | सांगली प्रतिनिधी : राजू कदम

जयभीम क्रांती सेनेने निवेदनात असा आरोप केला की, काही बँकांनी मागासवर्गीय वस्त्यांना कथितपणे "रेड झोन" घोषित करून दलित नागरिकांना कर्ज नाकारण्याची भूमिका घेतली आहे. हा प्रकार सामाजिक व आर्थिक बहिष्काराचा असून संबंधित बँक अधिकारी व व्यवस्थापकांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

पोलिस प्रशासनावरही सवाल,

महिलांनी बेकायदेशीर वसुली व अवैध सावकारीबाबत तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यानंतरही तक्रारी दाखल करण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप संघटनेने केला. परराज्यातील व स्थानिक अनधिकृत सावकारांवर कठोर कारवाई होत नसल्याने पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.



संघटनेच्या प्रमुख मागण्या,

आरबीआय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई.अवैध सावकारांविरोधात विशेष मोहीम राबवून व्यवहारांची तपासणी.जातीय भेदभावामुळे कर्ज नाकारणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई.तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई.पीडित महिला व नागरिकांना तात्काळ संरक्षण.जयभीम क्रांती सेनेने इशारा दिला की, मागण्या तातडीने मान्य न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

No comments:

Powered by Blogger.